या लेखात आपण अंबरनाथ प्राचीन शिव मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व,मान्यता आणि वैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मध्ये आहे.अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजे आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर हे पांडवकालीन असल्याचे मानले जाते. मुंबईपासून अवघ्या ६५ किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर,हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया या प्राचीन मंदिराची गोष्ट
राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी इसवी सन १०६० या कालखंडात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. एवढं ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे मंदिर अनेक वर्षं दुर्लक्षितच आहे.अजूनही अनेक मुंबईकरांना तसंच इथे येणाऱ्या पर्यटकांना या मंदिराची पुसटशीही माहिती नाहीये,असं दिसून येतं.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ६५ किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तिथून खाजगी रिक्षा केली की सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज जाता येते.
१.अंबरनाथ शिवमंदिराची ऐतिहासिक माहिती :
उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे देऊळ उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स.१०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या देवळाचे बांधकाम पूर्ण झाले. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथ शिवमंदिर या प्राचीन मंदिराचा समावेश आहे.
स्थानिकांच्या मान्यतेनुसार पांडवांनी एका रात्रीत एका मोठ्या दगडातून हे मंदिर बांधले.अंबरनाथ मंदिर वालधुनी नदीवर मंदिर बांधले आहे. हे मंदिर भूमीजा शैलीत बांधलेले आहे, जे शिलहाराच्या वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे.काळ्या बेसाल्टचा वापर करून मंदिर बांधण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये इ.स.पूर्व २०० पासून लोक राहत होते. इ.स १४१५ च्या सुमारास गुरु नानक मंदिरात आले होते. दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक या देवळात जातात.
२.वास्तुकलेचा उत्तम नमुना :
अंबरनाथ शिवमंदिराच्या उत्तर भागात इ.स १०६० काळातला संस्कृत शिलालेख आढळतो . मंदिरात मुख्य प्रवेशद्वारावर दोन मोठे,सुंदर कोरीव खांब आहेत. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त आणखी दोन प्रवेशद्वार आहेत. भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती प्रवेशद्वावर आहे.अंबरनाथ शिवमंदिरात अनेक पायऱ्या,अनेक देवतांची शिल्पे,कोरीवकाम आणि रचना आहेत. यात एक मुख्य खोली आहे, ज्याला गाभारा म्हणतात, जिथे शिवलिंग ठेवलेले आहे. शिवमंदिर जुन्या हेमाडपंथी शैलीतील दगडाच्या एका तुकड्यापासून बनवले गेले होते, अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत.
३.अंबरनाथ शिवमंदिराची रचना :
अंबरनाथ शिवमंदिराभोवती एक दगडाची भिंत आहे.समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे.मंदिर हे दोन भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुंदर आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती कोरलेली आहे.
धार्मिक विधी करण्यासाठी एक मोठे अंगण आहे.सभामंडपाला दक्षिण, पश्चिम आणि पूर्वेकडे तीन प्रवेशद्वार आहेत, प्रत्येकाचा स्वतःचा मंडप आहे. मंदिराचे आतील भाग कथात्मक फलक, शिल्प यांनी सजलेले आहे. खांब अत्यंत विस्तृत कोरीवकामाने सुशोभित केलेले आहेत.मंडपापासून सुमारे २० पायऱ्यांनी खाली गर्भगृह आहे. मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावे लागते. गाभाऱ्याचा आतील भाग साधा आहे.
४.मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ :
महाशिवरात्री म्हणजे जेव्हा अनेक भाविक एकत्र येतात आणि देवाची भक्ति भावाने पूजा करतात.दुसरीकडे,जेव्हा श्रावण महिना सुरू होतो,तेव्हा भक्त पुन्हा त्यांच्या देवाची पूजा करण्यासाठी एकत्र येतात आणि अंबरनाथ शिव मंदिर वर्षाच्या या काळात श्रद्धाळू भावीकानी भरलेले असते.
अंबरनाथ शिवमंदिराची वेळ :
सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत मंदिर खुले असते.
मुख्य सण महाशिवरात्री,या मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम महिना फेब्रुवारी-मार्च आहे. महाशिवरात्रीच्या दिवसात हजारो भाविक अंबरनाथ मंदिराला भेट देतात.
कसे जाल?
जवळचे रेल्वे स्टेशन: अंबरनाथ रेल्वे स्टेशन १.६ किमी आहे.
जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबईपासून अंदाजे ५० किमी अंतरावर अंबरनाथ रेल्वेस्थानक आहे.
अंबरनाथ स्थानकवरून रिक्षा,कॅब किंवा खाजगी वाहन भाड्याने घेता येते.