कराड

कराड नकट्या रावळ्याची  विहीरमागचा इतिहास: मजेदार तथ्ये

कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे.आहे. तेथे असणाऱ्या पायविहिरीला स्थानिक नागरिक नकट्या रावळ्याची विहीर म्हणून ओळखतात.दगड आणि पांढऱ्या मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ‘ नकट्या रावळाची ‘ ही विहीर सुमारे 41.5 मीटर लांब असून, त्यात 30.5 मीटर लांबीचा सोपानमार्ग व खाली 11 बाय 11 मीटर चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी 84 पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे .

प्रत्येक 20 पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी (सोपान) आहे. पायऱ्या संपतात त्या ठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत.12 व्या शतकात ‘शिलाहार’ राजवटीत नकट्या रावळ्याच्या ही ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती. 12 व्या शतकात ‘शिलाहार’ राजवटीत ही ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती. ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे सांगण्यात येते. विहीर सुस्थितीत असून त्याची रचना स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे.

पंताचा कोट या किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने ओळखतात. विहीर किल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४मी उंचीवर आहे. तिच्यात कोयनेचे पाणी खापरी नाहरद्वारे सोडण्यात येत असावे ही विहीर सुमारे ४१.५मी लांब असून त्यात ३०.५मी लांबीचा सोपनमार्ग व खाली ११×११ मी चौरासकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीचा ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार आहे. येथे उपशांची व्यवस्था आहे आणि आत उतरण्यासाठी ८२ पायऱ्या आहेत. दर २० पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे. 

जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभावर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कामानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केले आहे. नदीच्या बाजूने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. विहिरी बाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा. दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खाचा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळया ठसवून या विहिरीचे सहा ते सात मजल्यामध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे.

 आजही काही खाचत लाकडी तुळया दिसून येतात. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याशिवाय विहिरीच्या प्रवेश मार्गांवर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे. केवळ पाणी साठवण्यासाठी तिचा उपयोग होत नसावा किंवा शेजारची परस्थिती पाहता शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी ही जागा वाटत नाही. अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग येत असावी. ही वास्तू केंद्रीय विभागाने सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. नकट्या रावळ्याची विहीर भुईकोट किल्ल्यात नसून किल्ल्यालगत आहे. किल्ला काळाच्या ओघात जवळपास नामशेष झाला आहे परंतु नकट्या रावळ्याची विहीर सुस्थितीत आहे.खरं पाहिलं तर कराडला ऐतिहासिक वारसा आहे. इथल्याच पंतांच्या कोटात शिवकालीन भुईकोट किल्ला असून, त्याचाच एक भाग म्हणजे येथील ‘नकट्या रावळ्या” (NAKTYA RAWLYACHI VIHIR) ची विहीर !

 कराड शहराच्या वायव्येस कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो तिथेच यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.  ह्याच प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे.आहे. तेथे असणाऱ्या पायविहिरीला स्थानिक नागरिक “नकट्या रावळ्याची” विहीर म्हणून ओळखतात. दगड आणि पांढऱ्या मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ‘ नकट्या रावळाची ‘ ही विहीर सुमारे 41.5 मीटर लांब असून, त्यात 30.5 मीटर लांबीचा सोपानमार्ग व खाली ११ बाय ११ मीटर चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी ९९ पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे .प्रत्येक 20 पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी (सोपान) आहे. पायऱ्या संपतात त्या ठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत.12 व्या शतकात ‘शिलाहार’ राजवटीत नकट्या रावळ्याच्या ही ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती.

 ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे सांगण्यात येत.सध्या पुरातत्व खात्याच्या अख्यारीत असूनसुद्धा ह्या विहिरींची दुरावस्था दिसून येते. फक्त पाणी जरी स्वच्छ केलं तरी ह्या विहिरीला नवसंजीवनी प्राप्त होईल. खरतर इतकी भव्य असलेली विहीर हि सुट्टीच्या दिवशी रिकामी पहिली आणि मनात थोडंसं दुःख वाटलं पण शांततेचा आनंद मिळाल्याचं समाधान हि लाभलं. कोणी नसल्यामुळे फोटो काढण्यास हि काही अडथळा नव्हता खूप सारे फोटो काढले आणि कराड वरून परत पुण्याच्या वाटेला लागलो. 

कसे जाल : 

By Air

 Nearest Airport – Karad

By Train

Nearest Railway Station – Karad Station

By Road

About 7 km from Karad Railway Station.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top