karnala fort

कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य: इतिहास आणि निसर्ग यांचे मिश्रण

कर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो.रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर आहे.

इतिहास :

देवगिरीचे यादव (१२४८ –१३१८) आणि तुघलक शासक (१३१८ –१३४७) यांच्या अंतर्गत किल्ला सुमारे १४०० पूर्वी बांधला गेला आहे, हा किल्ला  नंतर गुजरात सल्तनतच्या अधिपत्याखाली आला परंतु १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने त्याचा ताबा घेतला. गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी वसई येथील पोर्तुगीजांच्या कमांडिंग ऑफिसर डॉम फ्रान्सिस्को डी मेनेन्सेसच्या  याला मदतीची विनंती केली. त्याने आपल्या ५००  सैनिकांना कर्नाळा किल्ला जिंकण्याचा आदेश दिला आणि त्यांनी हा किल्ला जिंकला. यानंतर  या किल्ल्यावरती गुजरात सल्तनतचा प्रभारी राहिला होता पण पोर्तुगीज सैन्याने गुजरातचा सुलतान किल्ला  पोर्तुगीजांच्या स्वाधीन करून वसईला पळून गेला .कर्नाळा  किल्ल्याच्या पराभवामुळे निजामशाह संतापला, ज्यांनी किल्ला आणि आसपासच्या ग्रामीण भागावर पुन्हा  जिंकण्यासाठी ५०००  सैनिक पाठवले.परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेतला.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७०  मध्ये मोगलांकडून  जिंकला.१६८० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने ताब्यात घेतले.यानंतर काही काळ मोगलांचा या किल्ल्यावरती वावर होता.कर्नल प्रोथरने किल्ला जिंकून १८१८ मध्ये तेथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य स्थापन करेपर्यंत हे किल्लेदार (गॅरीसन कमांडर) अनंतरावच्या अधिपत्याखाली राहिले. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाटद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात येतो. कर्नाळा किल्ल्याचा सुळका  किल्ल्याचे विशेष आकर्षण आहे आहे, हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो. परंतु सध्या तो सुस्थितीत नाही. कर्नाळा किल्ल्यावर करणाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत.

१.करणाई देवीचे मंदिर:

गडावरती पुरातन करणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला  दगडी सतीशिळा आहेत.

karnai

 २.तटबंदी:

किल्ल्याच्या भोवती भक्कम तटबंदी आहे. काळाच्या ओघात तटबंदीचे बरेचसे नुकसान झाले आहे.

 ३.थंड पाण्याच्या टाक्या: 

किल्ल्यावरती  थंड पाण्याच्या दोन टाक्या आहेत. त्यामुळे किल्ल्यावरती मुबलक पाण्याची सोय आहे.

५.बुरूज : 

किल्ल्यावर ते दोन बुरुज आहेत. हे बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

रायगड जिल्ह्यतील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून सुमारे  बारा किलोमीटरवर आहे. कर्नाळा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर विविध पक्षांनी संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे.१२.१५५ चौरस किलोमीटरच्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. आपण येथे  १४७ प्रजातींचे पक्षी पाहू शकतो. त्यात ४०  प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सैबेरियातून पक्षी येथे येतात.मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे, मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज आदी पक्ष्यांचे सहजतेने दर्शन होते.

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा  बराचसा भाग  मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे,यात विविध प्रकारच्या ६५०  वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात आहेत.पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक विविध वनस्पती अस्तित्वात आहेत.

कर्नाळा हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या  आवाजाचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठय़ासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. जवळच नजरेच्या टप्प्यात प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड गड किल्ले आहेत.आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचंच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.

पावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक छोटे छोटे ओढे  इथे वाहत असतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच सुंदर दिसतं. अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते. अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पिशव्या व इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. 

कसे  जाल?

जवळचे रेल्वे स्थानक: पनवेल

जवळचे बस स्थानक:पनवेल

पनवेल बस स्थानकावरून सकाळी पाच ते आठ रात्री आठ या दरम्यान अर्ध्या तासाने बसेसची सोय आहे पनवेल मध्ये जेवणाची सोय होऊ शकते

पनवेलवरून पेण अलिबाग रोहा साई केलवणे कोणतीही एस.टी. बस कर्नाळ्याला जाते. पनवेल-पळस्पे-शिरढोण-चिंचवण नंतर पुढील थांबा कर्नाळा अभयारण्य आहे. एस.टी. बस कर्नाळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच थांबते. प्रवेशद्वारापासून किल्ल्यावर जाण्यास जवळपास दोन तास लागतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top