sion fort

सायन किल्ला: एक संक्षिप्त इतिहास तुम्हाला माहित असावा

सायन किल्ला महाराष्ट्राच्या मुंबई शहरातील एक किल्ला आहे. हा किल्ला भारतातीत ब्रिटिश सरकारने बांधला होता. याची रचना १६६९ ते १६७७ दरम्यान झाली. त्यावेळी हा किल्ला ब्रिटिश अधिपत्याखालील परळ बेट आणि पोर्तुगीज अंमलाखालील साष्टी बेटांच्या सीमेवर होता.येथून जवळ असलेले शिवडीचा किल्ला आणि रिवा किल्ला हे एकमेकांना संरक्षण पुरवीत.

१९२५ मध्ये हा किल्ला पहिल्या प्रतीची वारसा इमारत असल्याचे जाहीर केले गेले. टेकडीवर असलेला हा किल्ल्या भग्नावस्थेत आहे. किल्ल्याच्या भिंती पडलेल्या अवस्थेत असून त्यांवर वृक्षवेली उगवलेल्या आहेत. येथे येणाऱ्या लोकांनी भिंतींवर लिहून ठेवणे, चित्रे काढणे, दगड उचलून फेकणे, असे अनेक प्रकारचे उत्पात केलेल आढळतात. २००९ मध्ये या किल्ल्याचे पुनरुत्थान सुरू झाले होते परंतु पैशाच्या अभावी हे बंद पडले. या टेकडीच्या पायथ्याशी भारतीय पुरातत्त्व खात्याचे कार्यालय आहे.हा किल्ला शीव रेल्वे स्टेशनापासून ५०० मीटर अंतरावर आहे आणि जवळच एक उद्यानही आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ २ तोफा पडलेल्या आहेत.किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे.जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे.किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत.भारताच्या महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे शहर मुंबई येथील एक महत्वाचा किल्ला म्हणजेच शीवचा किल्ला किंवा सायनचा किल्ला

महाराष्ट्राची राजधानी मुंबई रोजगार, व्यवसाय, आधुनिकता यासाठी प्रचलित आहे, परंतु एकेकाळी मुंबई हे बेटांचे शहर होते आणि त्यात बरेच किल्ले होते.माहीम खाडीच्या पूर्वेकडे इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला बांधून घेतला.हा किल्ला अखेरपर्यंत इंग्रजांच्याच ताब्यात राहिला.ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.

कसे जाल ? 

मुंबईतील मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरल्यानंतर पूर्वेला चालत १० मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.

By Air

 Nearest Airport – Mumbai

By Train

Nearest Railway Station –  Mumbai  Station

By Road

It is about 1 km from Mumbai Railway Station.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top