bealpur

बेलापूर किल्ल्याला का भेट द्या: हे ऐतिहासिक स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी मुख्य कारणे

बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे. हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी याने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीज व मराठा साम्राज्यात होता. १९व्या शतकाच्या पुर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मध्य रेल्वेच्या सीबीडी बेलापूर ह्या रेल्वे स्थानकापासून २.५  किमी लांब आहे. सध्या ह्या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे.

इतिहास: 

इ. स. १५६० ते १५७० मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला, तेव्हा सिद्दींनी हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ, एका टेकडीच्या माथ्यावर बांधला. १६८२ मध्ये, हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्दींनी नियंत्रित केलेल्या बेलापूरजवळील प्रदेशांना (त्या काळात शाबाज म्हणून ओळखले जाणारे) त्यांनी ताब्यात घेतले.पनवेलची खाडी, ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेल आहे. मुख्यत्वे कोळ्यांची वस्ती असलेल्या गावात जंजिऱ्याच्या सिद्दी याने किल्ला बांधला, तो म्हणजे बेलापूरचा किल्ला.१७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला.

 पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतैश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने २३ जून १८१७ रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटीशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला. त्याच्या सक्रिय दिवसांमध्ये, किल्ल्यात चार तुकड्या प्रत्येकी १८० माणसांच्या आणि ४-१२ पाउंड (२-५ किलो) वजनाच्या १४ बंदुका ठेवल्या होत्या. ह्या किल्ल्यात एक बोगदा देखील अस्तित्वात आहे असे मानले जाते, जो अनेक स्थानिकांच्या मते ते घारापुरी बेटाशी जोडले गेला आहे, जे एलिफंटा लेण्यांचे ठिकाण आहे.

वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणार्‍या वाहातूकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलिकडील मराठ्यांकडून होणार्‍या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी बेलापूरचा किल्ला बांधला. अनेक रोमहर्षक घडामोडी पाहीलेला किल्ला आज कसाबसा तग धरुन उभा आहे. बेलापूरच्या झपाटयाने होणार्‍या विकासामुळे किल्ल्याचे उरलेले मोजकेच अवशेष इमारतींच्या गराड्यात हरवले आहेत व नष्ट होणाच्या मार्गावर आहेत. पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. 

३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १९३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.

पहाण्याची ठिकाणे :

बेलापूरचा किल्ला ज्या खाडीकाठी उभा होता त्यात भराव टाकून इमारती बांधल्यामुळे किल्ल्याचे थोडेच अवशेष शिल्लक राहीले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एकूलता एक बुरुज उभा आहे. बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार जिना आहे. किल्ल्याची तटबंदी अस्तित्वात नाही, पण बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष व दुमजली गोल मनोरा दिसतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर सध्या इमारतींच्या गराड्यात आहे. या शिवाय रेतीबंदर जवळ दोन चौकोनी विहीरी व पोर्तुगिजकालीन तलाव आहे.

जतन व संवर्धन: 

हा किल्ला शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) अखत्यारीत येतो. तो जीर्ण अवस्थेत आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे नियोजन सुरू आहे. रहिवाशांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून किल्ला डम्पिंग आणि डेब्रिजपासून वाचवला आहे. परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या परिसरातील तलाव देखील बुजण्याचा धोका आहे.जानेवारी २०१८  पर्यंत दिलेल्या संदर्भानुसार कोणतेही नूतनीकरण किंवा जीर्णोद्धार नाही.

पोहोचण्याच्या वाटा :

डोंबिवली, ठाणे, कल्याण, मुंबई येथून बेलापूरला बससेवा आहे. या बसने बेलापूर किल्ला या थांब्यावर उतरुन बागे जवळील बुरुजाकडे जाता येते डांबरी रस्त्याने तसेच पुढे गेल्यास दक्षिणेकडील टेकडीवर बालेकिल्ल्यात जाण्यासाठी पायर्‍या आहेत याच रस्त्याने पुढे गेल्यास रेतीबंदरकडे जाता येते.

विमानाने 

जवळचे विमानतळ – मुंबई

ट्रेनने 

जवळचे रेल्वे स्टेशन – बेलापूर रोड

रस्त्याने

 बेलापूर रोड रेल्वे स्थानकापासून सुमारे ३ कि.मी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top