vande

वंदे भारत एक्सप्रेस :पूर्ण,मार्गदर्शक वेळ,मार्ग आणि भाडे

वंदे भारत एक्सप्रेस(vande bharat) ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. आजच्या घडीला नवी दिल्ली-वाराणसी , नवी दिल्ली-कटरा , मुंबई ते अहमदाबाद , मुंबई ते सोलापूर , मुंबई ते साईनगर शिर्डी ह्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या कार्यरत आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग १३० ते २००  किमी/तास इतका असून २०२३ सालापर्यंत ७५ गाड्या चालवण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे.

इतिहास:

भारतामध्ये रेल्वे वाहतूक गेले अनेक दशके कार्यरत असली तरीही देशामध्ये एकही द्रुतगती रेल्वे नव्हती. सुमारे ९९ मैल/तास इतक्या कमाल वेगाने धावणारी गतिमान एक्सप्रेस ही भारतामधील सर्वात जलद रेल्वेगाडी होती. द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याऐवजी विद्यमान मार्गांचा वापर करून द्रुतगती रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू होते. वेगाबरोबरच खर्च व सुरक्षितता देखील विचरात घेणे रेल्वेला आवश्यक वाटत होते. २०१७ साली रेल्वेने ट्रेन १८ नावाचा प्रकल्प हाती घेतला ज्याअंतर्गत २०१८ सालापर्यंत विजेवर धावणारी संपूर्ण भारतीय बनावटीची रेल्वेगाडी विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. ऑक्टोबर २०१८ मध्ये ह्या गाडीची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली व फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासी सेवेला हिरवा बावटा दाखवला. नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर रेल्वेने ऑक्टोबर २०१९ मध्ये नवी दिल्ली-वैष्णोदेवी ही दुसरी वंदे भारत गाडी चालू केली. ह्या गाडीच्या धर्तीवर राजधानी एक्सप्रेसच्या ऐवजी धावणारी ट्रेन २० नावाची अद्ययावत गाडी देखील विकसनशील आहे.

रचना व बनावट:

वंदे भारत एक्सप्रेसच्या विद्यमान रचनेमध्ये १६ डबे असून त्यात एकूण १,१२८ प्रवासी बसू शकतात. गाडीच्या दोन्ही बाजूंस चालकांचे कक्ष असल्यामुळे ही गाडी दोन्ही दिशांना धावू शकते. संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या ह्या गाडीत शयनयान सुविधा नसून केवळ बसण्याची सोय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाय-फाय, गाडीचा वेग, पुढील स्थानक,फिरत्या खुर्च्या,जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे,  इत्यादी माहिती पुरवणारी यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, आपोआप फ्ल्श होणारी शौचालये, इत्यादी अनेक अद्ययावत सुविधा ह्या गाडीमध्ये देण्यात आल्या आहेत.या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधाजेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी फिरणारी  चेअरही आहे.मोबाईल किंवा कॅमेरात सुंदर  दृश्य टिपण्याचा आनंद अगदी विमानात प्रवासाचा अनुभव या रेल्वेत येतो.   

सध्या देशात कुठे सुरू आहे वंदे भारत

देशात सध्या ८ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी २०१९मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. दुसरी रेल्वे दिल्ली ते माता वैष्णोदेवी कटराला धावली. यानंतर आताची वंदे एक्सप्रेस ही गेल्या वर्षी मुंबई ते अहमदाबाद धावली, चौथी वंदे भारत हिमाचल प्रदेश – दिल्ली ते उना दरम्यान धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाचवी वंदे भारत धावली. ती म्हैसूर आणि चेन्नई दरम्यान धावली. सहावी महाराष्ट्रातील नागपूर ते छत्तीसगमधील बिलासपूर इथे धावली. सातवी हावडा ते न्यू जलपाईगुडी इथे धावली. आठवी वंदे भारत १५ जानेवारीला तेलंगणातील सिंकदराबाद इथून आंध्र प्रदेश ते विशाखापट्टणमला धावली.

२०२५ पर्यंत कुठल्या राज्यांमध्ये धावणार

दरम्यान, रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील वंदे भारत हावडा-पाटणा आणि वाराणसी-हावडा दरम्यान धावू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे २०२५ मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक वंदे भारत गाड्यांची घोषणा होऊ शकते. यामध्ये असं बोललं जात आहे की, बिहार व्यतिरिक्त झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, केरळ, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढे वंदे भारत धावण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top